करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही प्रमाणात लोक करोनातून बरे होत आहेत. पण असे असले तरी सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यात देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींपासून ते प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री तसेच इतर जबाबदार मंत्री नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहेत.

वाईट बातमी! दिग्गज क्रिकेटपटूचे मुंबईतील राहत्या घरी निधन

करोनाचा फटका क्रीडाक्षेत्रालाही बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. IPL देखील अद्याप सुरू झालेले नाही. २९ मार्चपासून नियोजित असलेले IPL करोनाच्या तडाख्यामुळे १५ एप्रिलपासून सुरू होणार होते. मात्र करोनाचा फैलाव अद्याप कमी झाला नसल्याने यंदाचे IPL रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सारे क्रिकेटपटू घरात आहेत. क्रिकेटचे प्रशिक्षण वर्गदेखील बंद आहेत, पण महेंद्रसिंग धोनी आणि आर अश्विन यांच्या अकादमीतर्फे लॉकडाऊनच्या काळातही मुलांना प्रशिक्षण दिले जात आहे.

Coronavirus : लॉकडाउन काळात रोहित शर्माचं काय चाललंय बघा…

आर अश्विन आणि धोनी यांच्या अकादमीकडून खेळाडूंना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. फेसबुकवरून लाईव्ह प्रशिक्षक वर्ग भरवला जात आहे. धोनी स्वतः त्याच्या क्लासमध्ये प्रशिक्षण देत नसला, तरी त्याच्या अकादमीतील प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत. रविचंद्रन अश्विन मात्र स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे. त्यांच्या या ऑनलाईन ट्रेनिंगला चांगला प्रतिसादही मिळत आहे. धोनीच्या अकादमीचे मुख्य प्रशिक्षक सत्रजीत लाहिरी यांनी सांगितले की प्रत्येक प्रशिक्षण वर्गाच्या व्हिडीओला १०,००० पर्यंत व्ह्यू मिळतात.

Story img Loader