करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही अंशी लोक करोनातून पूर्णपणे बरे होत आहेत. करोनाचा फटका क्रीडाक्षेत्रालाही बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान क्रीडाक्षेत्राशी संबंधित एक वाईट बातमी आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरे देवा! या शोएब अख्तरचं करायचं तरी काय? पुन्हा झाला ट्रोल

क्रीडाक्षेत्रातील पाच ते सहा खेळाडू करोनाचे बळी ठरले आहेत. त्यानंतर आता क्रीडाक्षेत्राशी संबंधित एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका प्रतिष्ठित कंपनीसोबत क्रीडा छायाचित्रकार म्हणून कार्यरत असलेला अँथनी कॉसी याते करोनामुळे निधन झाले. तो ४८ वर्षांचा होता. रविवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या नॉर्थ शोर युनिव्हर्सिटी रूग्णालयात त्याचा दुर्दैवी अंत झाला. कॉसीच्या प्रश्चात्त त्याची पत्नी रोमानीया, मुले जॉन आणि मिया असा परिवार आहे.

Coronavirus : क्रीडाविश्वावर शोककळा! महान क्रिडापटूचे उपचारादरम्यान निधन

वाईट बातमी! दिग्गज क्रिकेटपटूचे मुंबईतील राहत्या घरी निधन

अँथनी आमचा सहकारी होता. तो एक चांगला मित्र आणि उत्तम पत्रकार होता, असे तो कार्यरत असलेल्या वृत्तपत्राचे संपादक स्टीफन लिंच म्हणाले. न्यूयॉर्कमधील सर्वोत्तम फोटोग्राफर्सपैकी तो एक होता. तो असामान्य छबी टिपण्यात निष्णात होता. त्याने ज्यांची ज्यांची छायाचित्र काढली, ते सारे त्याचा आजही आदर करतात. गेली २५ वर्षे तो अतिशय उत्तमपणे छायाचित्रणाचे काम करत होता”, असेही लिंच म्हणाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus lockdown sad news sports photographer anthony causi passed away of covid 19 vjb