करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही अंशी लोक करोनातून पूर्णपणे बरे होत आहेत. करोनाचा फटका क्रीडाक्षेत्रालाही बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान क्रीडाक्षेत्रातून एक वाईट बातमी आली आहे. करोनाची लागण झालेल्या एका दिग्गज खेळाडूची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

हार्दिक पांड्याच्या ‘कॉफी विथ करण’ प्रकरणावर युवराजचं सडेतोड मत, म्हणाला…

सध्या करोनामुळे रुग्णांचा जगभरातील आकडा हा १४ लाखांपार पोहोचला आहे. तर मृतांचा आकडादेखील दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत असून सध्या ८२ हजारांहून अधिक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यात सकारात्मक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे ३ लाख रूग्ण पूर्णपणे बरेदेखील झाले आहेत. परंतु या दरम्यान क्रीडाक्षेत्रातून करोना संबंधी एक वाईट बातमी आहे.

CoronaVirus : लोक वाचायला हवेत, ट्रॉफी परत जिंकता येतील… बक्षिसं विकून गोल्फपटूची करोनाग्रस्तांना मदत

करोनाच्या प्रार्दुभावामुळे आतापर्यंत चार खेळाडूंना प्राण गमवावे लागले आहेत. त्यात आता आणखी एका दिग्गज खेळाडूची भर पडली आहे. बुधवारी करोनाची लागण झालेले स्वित्झर्लंडचे दिग्गज आईस हॉकीपटू रॉजर चॅपट यांचे निधन झाले. स्वित्झर्लंडकडून त्यांनी १०० हून अधिक सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र करोनाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. ते ७९ वर्षांचे होते.

IPL 2020 : “क्रिकेटचं नंतर बघू”; पुजाराने IPL आयोजनावरून सुनावलं…

आंतरराष्ट्रीय आईस हॉकी महासंघाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रॉजर हे दोन आठवडे रूग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर ते घरी परतले आणि एक एप्रिलला त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यानंतर त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रॉजर हे स्वित्झर्लंडचे महान खेळाडू होते. 60 चे दशक रॉजर यांनी चांगलेच गाजवले.”

Story img Loader