सध्या करोनामुळे जग लॉकडाउन असताना विश्वचषक विजेत्या हॉकी संघातील माजी खेळाडू अशोक दिवाण हे अमेरिकेत अडकले आहेत. त्यांची प्रकृती खालावली असून भारतात परतण्यासाठी तातडीने व्यवस्था करावी, अशी विनंती त्यांनी क्रीडा मंत्रालयाला केली होती. दिवाण हे भारताने १९७५ मध्ये जिंकलेल्या विश्वचषक हॉकी संघातील माजी खेळाडू आहेत. दिवाण यांनी सर्वात प्रथम भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बात्रा यांच्याशी संपर्क साधला. दिवाण यांच्या मागणीची दखल घेत आता क्रीडा मंत्रालय सक्रीय झाले आहे.
Coronavirus : क्रीडाविश्वावर शोककळा! महान क्रिडापटूचे उपचारादरम्यान निधन
दिवाण यांनी केला भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बत्रा यांच्याशी संपर्क साधला होता. “मी अमेरिकेत अडकलो असून माझी तब्येत बिघडली आहे. कॅलिफोर्निया येथे गेल्या आठवडय़ात मला तातडीने उपचार घ्यावे लागले. माझ्याकडे येथे वैद्यकीय विमा नाही. या स्थितीत अमेरिकेत उपचार घेणे परवडणारे नाही. नियोजित कार्यक्रमानुसार २० एप्रिलला एअर इंडियाच्या विमानाने मी भारतात परतणार होतो. मात्र लॉकडाउनमुळे मी भारतात परतू शकलो नाही. मला अमेरिकेतील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत करावी किंवा सॅन फ्रान्सिस्कोहून भारतात परतण्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा,” अशी विनंती दिवाण यांनी बत्रा यांच्याकडे केली होती. तसेच, यावर लवकरात लवकर मार्ग काढावा, कारण प्रकृती खालावत चालली आहे, असेही दिवाण यांनी होते.
याची दखल घेत भारताचे क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी दिवाण यांना मदत पाठवल्याचे ट्विट करून स्पष्ट केले आहे. “विश्वविजेते हॉकीपटू अशोक दिवाण हे अमेरिकेत अडकले असून त्यांची प्रकृती खराब आहे. त्यांनी भारतीय ऑलिम्पिक समितीमार्फत क्रीडा मंत्रालयाशी संपर्क साधला होता. त्यांच्या विनंतीनुसार सॅनफ्रॅन्सिको येथील भारतीय दूतावासात संपर्क साधण्यात आला आहे. दिवाण यांना लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी भारतीय दूतावासाकडून डॉक्टर पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Hockey Olympian Ashok Diwan is stranded in the US and is unwell. He reached out to @KirenRijiju through IOA. The Indian Embassy in San Francisco has been contacted, they’re sending a doctor to attend to Mr. Diwan to ensure he receives immediate medical attention. @WeAreTeamIndia
— Kiren Rijiju Office (@RijijuOffice) April 9, 2020
ध्यानचंद पुरस्कार विजेते ६५ वर्षीय दिवाण यांनी १९७६च्या ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दिवाण यांचे पत्र केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पाठवून याप्रकरणी त्वरित निर्णय द्यावा अशी विनंती केली आहे.