CoronaVirus Outbreak : करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. जगभरात सुमारे दीड लाखांहून अधिक लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास ७८ हजार लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून याबाबत जनजागृती केली जात आहे. या दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेबाबत यजमानपद असलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महत्त्वाची अपडेट दिली आहे.
CoronaVirus : पाकिस्तानला करोनाचा फटका, केली महत्त्वाची घोषणा
करोनामुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. करोनामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, श्रीलंका विरुद्ध इंग्लंड, बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान आदी क्रिकेट मालिका रद्द झाल्या. याशिवाय, इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2020), पाकिस्तान सुपर लीग (PSL 2020) यासारख्या टी २० लीग स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. त्यामुळे करोनाचा आगामी स्पर्धांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केला आहे.
Video : धोनीची बाईक राईड; सेल्फीसाठी चाहत्यांची झुंबड
There are no plans to reschedule the Men’s T20 World Cup scheduled for Australia in October and November, says CA CEO Kevin Roberts.https://t.co/qUzYfQajEJ
— cricket.com.au (@cricketcomau) March 17, 2020
पुरुषांचा टी २० विश्वचषक हा ऑस्ट्रेलियात १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत विराट कोहलीची टीम इंडिया २४ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. भारतीय पुरुष संघाला या स्पर्धेत ब गटात स्थान देण्यात आले आहे.
“स्मिथ धाडकन जमिनीवर कोसळला आणि…”; वॉर्नरने सांगितली आपबिती
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देशांतर्गत होणारी शेफिल्ड शिल्ड स्पर्धा रद्द करून न्यू साऊथ वेल्स संघाला जेतेपद जाहीर केले. मात्र ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेपर्यंत परिस्थिती सुधारेल आणि स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल, अशी आशा त्यानी व्यक्त केली आहे.
CoronaVirus : “दुसऱ्या देशांकडून थोडं शिका’; ‘बर्थ डे गर्ल’ सायनाचा चाहत्यांना सल्ला
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हीन रॉबर्ट म्हणाले की १५ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात मोठ्या संख्येने प्रेक्षक येतील आणि जगाला प्रेरणादायी संदेश देतील. येत्या काही आठवड्यात किंवा महिन्यात सर्व क्रीडा स्पर्धा सुरळीत सुरू होण्याची अपेक्षा आहे. अशी परिस्थिती उद्भवेल असं कोणाच्या ध्यानीमनीही नव्हतं. पण परिस्थिती लवकरच सुधारेल आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी २० विश्वचषक स्पर्धा होईल.