सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत करोनासाठी निधी उभारण्यासाठी भारत-पाक सामने भरवावेत, अशी मागणी माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केली होती. त्यावर, या मार्गाने आम्हाला पैशाची गरज नाही असे माजी कर्णधार कपिल देव यांनी म्हटले होते. याचबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिले.
मित्रा… जिंकलंस! शोएब अख्तरवर गावसकर झाले फिदा
“सध्या मी दूरचा विचार करत आहे. नजीकच्या भविष्यकाळाचा विचार करता तुम्हाला खरंच असं वाटतं का की सध्या चर्चा करण्यासाठी क्रिकेट हा एकमेव मुद्दा आहे? मला सध्या त्या मुलांची चिंता आहे जे करोना मुळे शाळेत आणि कॉलेजांमध्ये जाऊ शकत नाहीयेत. हेच विद्यार्थी देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आधी शाळा कॉलेज सुरू झाली पाहिजेत. क्रिकेट फुटबॉल सारख्या खेळांच्या स्पर्धा नंतरही आयोजित केल्या जाऊ शकतात”, असे कपिल देव म्हणाले.
“… तोपर्यंत भारत-पाकिस्तान क्रिकेट नाहीच”
दहशतवादी कारवायांवरून पाकची कानउघाडणी
“भारत-पाक क्रिकेट मालिकेवरही त्यांनी पुन्हा आपले मत व्यक्त केले. “तुम्ही भावनिक होऊन म्हणू शकता की भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळली जायला हवी. पण सध्या सामने भरवणे ही प्राथमिकता मुळीच नाहीये. जर तुम्हाला पैसेच हवे असतील, तर तुम्ही सीमेपलीकडून भारताविरोधात करत असलेला दहशतवाद थांबवा आणि तो पैसा शाळा आणि रुग्णालये बांधण्यासाठी वापरा “, असे रोखठोक मत कपिल देव यांनी व्यक्त केले.
“जा…चीनबरोबर क्रिकेट खेळा!”; भारताकडून व्हेंटिलेटर मागणाऱ्या अख्तरला दमदार उत्तर
“भारताला जर आर्थिक मदतीची गरज भासली, तर देशभरातील विविध धार्मिक संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. लोक जेव्हा धार्मिक स्थळांना भेट देतात, तेव्हा ते शक्य ते सारं काही करतात. मग देशाला गरज भासली तर धार्मिक संस्थांनी मदत करणे गरजेचेच आहे”, असेही ते म्हणाले.