Coronavirus outbreak : करोना व्हायरसच्या तडाख्यामुळे सध्या देशभरात भीतीचे वातावरण आहे. सारेच देश या रोगावर मात करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. करोनाच्या भीतीने अनेक मोठे कार्यक्रम, संमेलने आणि कॉर्पोरेट इव्हेंट्सदेखील रद्द करण्यात आले आहेत. क्रीडा क्षेत्रालाही याचा फटका बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. तर काही क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

CoronaVirus : हृदयद्रावक ! २१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाची मृत्यूशी झुंज अपयशी

भारतातील आघाडीची टी २० लीग म्हणजेच IPL देखील २९ मार्चपासून सुरू होणार होते, मात्र करोनाच्या तडाख्यामुळे IPL १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. या स्थगितीनंतर IPL च्या यंदाच्या हंगामातील सामन्यांची संख्या कमी करून छोटेखानी IPL खेळवण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात असतानाच आता IPL 2020 बद्दल नवीन माहिती सांगण्यात येत आहे.

CoronaVirus : T20 World Cup बद्दल यजमान ऑस्ट्रेलियाकडून महत्त्वाची अपडेट

IPL 2020 चे आयोजन २९ मार्च २०२० पासून करण्यात आले होते आणि त्यात एकूण ६० सामन्यांचा समावेश होता. IPL चे प्रायोजक आणि इतर आर्थिक बाबींचा आढावा घेता IPL मधील एकही सामना कमी न करता IPL चे आयोजन एप्रिलऐवजी आणखी पुढे ढकलण्याचा विचार IPL प्रशासन करत असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. IPL 2020 चे आयोजन हे पूर्णपणे जसे आहे तसेच होण्याची शक्यता असून ही स्पर्धा जुलै ते सप्टेंबर या दरम्यान खेळवली जाऊ शकते.

CoronaVirus : पाकिस्तानला करोनाचा फटका, केली महत्त्वाची घोषणा

क्रिकेटचे वार्षिक कॅलेंडर लक्षात घेता जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ICC कडून आशिया कपचे आयोजन दुबईत सप्टेंबरमध्ये करण्यात येणार आहे. पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड यांच्यात द्विपक्षीय मालिका रंगणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड जून-जुलै महिन्यात हंड्रेड नावाची स्वत:ची क्रिकेट लीग लॉन्च करणार आहे. त्यामुळे इंग्लंड आणि पाकिस्तान वगळता ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचे जुलै ते सप्टेंबरचे वेळापत्रक तितकेसे व्यस्त नाही. आशिया कप व्यतिरिक्त जुन – जुलै मध्ये भारतदेखील केवळ ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्याशी द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या महिन्यांच्या कालावधीत IPL चे आयोजन करून, एकही सामना न वगळून, IPL भारतात किंवा परदेशात खेळवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.