करोना व्हायरसच्या तडाख्यामुळे सध्या जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अखेर संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली.
‘हम तुम एक कमरे में बंद हो’… पाहा हार्दिक-नताशाचा ‘लॉकडाउन’ स्पेशल फोटो
राज्यासह देशभरात लॉकडाऊन जारी केला गेला, तरीही नागरिकांकडून त्याचे अद्याप गांभिर्याने पालन करण्यात येत नसल्याचे दिसते आहे. काही ठिकाणी कलम १४४ लावूनही त्याचा सर्रास भंग केला जात आहे. त्यामुळे आता पोलिसही आक्रमक झाले असून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना ते दंडुकाचा चोप देताना दिसत आहेत. त्यामुळे अशा विनाकारण घराबाहेर भटकणाऱ्यांसाठी मास्टर ब्लास्टर सचिनने एक संदेश दिला आहे. मी देखील २१ दिवस माझ्या कुटुंबासह घरात बसलो आहे. सरकारच्या विनंतीला मान द्या आणि तुम्हीही घरातच राहा, असे ट्विट त्याने केले आहे.
Our government and health experts have requested us to stay at home & not venture out. Yet many people are doing so.
My family & I are at home, will not be stepping out for the next 21 days.
I request you all to do the same. #CoronavirusLockdown pic.twitter.com/WG2pkd6Ljc— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 25, 2020
दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडणाऱ्या ‘लोकांशी सौम्यपणे वागा, त्यांच्यावर थेट लाठीमार करू नका’, असे निर्देश राज्य पोलीस आणि शहर पोलिसांना दिले आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाय करण्यात आले आहेत, तसेच निर्बंधदेखील लादण्यात आले आहेत. राज्यात संचारबंदी लागू करून या काळात कुणीही घराबाहेर पडू नका, असे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, तरीही काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे अखेर पोलीस यंत्रणेला या लोकांना दंडुकांचा प्रसाद देणे भाग पडते आहे. याबाबतचे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. याबाबत राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती सौम्यपणे हाताळण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.