करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. करोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. २४ जुलैपासून रंगणारी टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धादेखील पुढे ढकलण्याचे संकेत आता देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद जपानकडे आहे. २४ जुलै ते ९ ऑगस्ट या दरम्यान ही ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित आहे. करोनाच्या संकटामुळे स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलावे अशी मागणी विविध स्तरातून केली जात होती. पण स्पर्धा नियोजित वेळीच होणार असा पवित्रा जपानचे सरकार आणि ऑलिम्पिक समिती यांच्याकडून घेण्यात आला. त्यानंतर आधी कॅनडा आणि नंतर ऑस्ट्रेलियाने आपले खेळाडू या स्पर्धेसाठी पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे या दुहेरी दणक्यानंतर जपानचे सरकार नरमलं असून प्रथमच ऑलिम्पिकचे आयोजन लांबणीवर टाकण्याचे संकेत देण्यात आले आहेत. सध्याची स्थिती पाहता ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलणे हे कदाचित अनिवार्य असल्याचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटले आहे.