करोना व्हायरसच्या फैलावामुळे भारतातील आघाडीची टी २० स्पर्धा IPL काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. तसेच अनेक मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या क्रिकेट आणि इतर क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्यांचे आयोजन पुढे ढकलण्यात आले आहे. असे असताना पाकिस्तान सुपर लीग टी स्पर्धा मात्र बिनदिक्कत खेळवण्यात येत होती, पण अखेर मंगळवारी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
IMPORTANT ANNOUNCEMENT#HBLPSLV postponed, to be rescheduled. More details to follow in due course.
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 17, 2020
आणखी वाचा- Coronavirus : …म्हणून मिचेल मॅक्लेनेघनला पत्नी सोडून गेली माहेरी
पाकिस्तान सुपर लीग या स्पर्धेची साखळी फेरी पूर्ण झाली होती. साखळी फेरीतून मुलतान टायगर्स, पेशावर झल्मी, लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्स हे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले होते. १७ मार्चला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढती खेळवल्या जाणार होत्या, तर अंतिम सामना १८ मार्चला होणार होता. पण या स्पर्धेत खेळत असलेले काही महत्त्वाचे परदेशी खेळाडू यांनी करोनाच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून स्पर्धेतून काढता पाय घेतला. त्यामुळे अखेर या स्पर्धेच्या बाद फेरीचे सामने नंतर खेळवण्यात येतील असा निर्णय घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही स्पर्धा तात्पुरती स्थगित केली.