गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेच्या दोन फलंदाजांनी अर्थात David miller आणि Chris Morris यांनी दिल्लीच्या आख्ख्या संघाची दमछाक केली. इतकंच नाही, तर दिल्लीच्या खिशात जाऊन बसलेला सामना अक्षरश: खेचून बाहेर काढला. विशेष म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून चर्चेत असलेल्या ख्रिस मॉरिसनं आपण का १६.२५ कोटींच्या खरेदीसाठी पात्र आहोत, सर्वच संघांना आणि तमाम क्रिकेट चाहत्यांना दाखवून दिलं. ही खेळी पाहून पहिल्या सामन्यात पंजाबविरुद्ध ख्रिस मॉरिसला स्ट्राईक न देता स्वत:च स्ट्राईकवर राहून सामना संपवण्याचा निर्णय घेणाऱ्या कर्णधार संजू सॅमसनला देखील ख्रिस मॉरिसला स्ट्राईक दिली असतील तर कदाचित पहिला सामनाही जिंकला असता, असाच विचार आला असावा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्ली कॅपिटल्सनं पहिली फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १४८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे वानखेडेच्या खेळपट्टीवर राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना हे आव्हान पार करणं फारसं कठीण जाणार नाही, असाच अंदाज वर्तवला जात होता. पण दिल्लीनं हार मानलेली नव्हती! दिल्लीच्या याच लढाऊ खेळीमुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत चुरशीचा ठरला!

IPL 2021: दिल्लीला पंतची चूक भोवली? १७व्या ओव्हरमध्ये उनाडकटला रनआऊट करण्याची संधी गमावली!

पहिल्या १० ओव्हरमध्ये झाल्या फक्त ४२ धावा!

राजस्थाननं डावाच्या सुरुवातीलाच ३ गडी गमावले. यामध्ये दोघे सलामीवीर आणि पहिल्या सामन्यातला शतकवीर कर्णधार संजू सॅमसन यांचा समावेश होता. त्यापाठोपाठ आठव्या षटकात शिवम दुबे आणि दहाव्या षटकात रियान पराग यांनी तंबूचा रस्ता धरला. यावेळी राजस्थानचा स्कोअर होता १० ओव्हरमध्ये ४२ धावा!

शिवम दुबे बाद झाल्यावर डेविड मिलर मैदानात आला. त्यानं सुरुवात सावध केली आणि खेळपट्टीवर जम बसवला. दुसऱ्या बाजूने विकेट पडत असताना मिलर सावध आणि शांत होता. दहाव्या ओव्हरमध्ये ४२ धावांवर असणारा राजस्थानचा धावफलक पुढच्या ५ ओव्हरमध्ये डेविड मिलरनं १०४ धावांपर्यंत नेला! सोळाव्या षटकात आवेश खानला त्यानं दोन लागोपाठ षटकार देखील ठोकले. पण पुढच्याच चेंडूवर असाच फटका खेळताना मिलर बाद झाला. २ उत्तुंग षटकार आणि ७ चौकारांनी मिलरनं ४३ चेंडूंमधली त्याची ६२ धावांची खेळी सजवली! आता राजस्थानला विजयासाठी २५ चेंडूंमध्ये ४४ धावा करायच्या होत्या आणि मैदानात होता आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस!

IPL 2021 : सनरायजर्सच्या पराभवानंतर ‘या’ तरुणीचे फोटो व्हायरल! कोण आहे ही तरुणी?

…आणि मॉरिसनं षटकारानं विजय साकारला!

ख्रिस मॉरिस मैदानात आला तेव्हा राहुल तेवतियानं समोरून आक्रमक फटकेबाजी सुरू केली होती. पण मॉरिस देखील मिलरप्रमाणेच सुरुवातीला सावध होता. १७ चेंडूंमध्ये १९ धावा करून तेवतिया बाद झाला आणि सगळी जबाबदारी मॉरिसवर येऊन पडली. मॉरिसनंही हळूहळू धावांचा वेग वाढवला. शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी १३ धावांची गरज होती. स्ट्राईकवर असणाऱ्या मॉरिसने पहिल्या रबाडाच्या पहिल्या चेंडूवर २ धावा केल्या. ५ बॉलमध्ये १२ धावा शिल्लक असताना त्यानं रबाडाला एक सणसणीत षटकार खेचला. त्याच्या पुढचा चेंडू निर्धाव गेला. ३ चेंडूंमध्ये ६ धावा जिंकण्यासाठी शिल्लक असताना सामना सुपर ओव्हरमध्ये जातो की काय असं वाटू लागलं होतं. पण मॉरिसनं पुन्हा एक उत्तुंग षटकार खेचला आणि सामना खल्लास केला! १८ चेंडूंमध्ये मॉरिसनं ३६ धावांची खणखणीत खेळी साकारली. यामध्ये ४ तितक्याच खणखणीत षटकारांचा समावेश होता!