WTC 2023 Final India vs Australia: लंडनमधील किंग्स्टन ओव्हल मैदानावर खेळल्या जाणार्‍या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये चार दिवसांचा सामना पूर्ण झाला आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी अनेक चाहते स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. दरम्यान, सामन्याच्या चौथ्या दिवशी एका जोडप्याने स्टेडियममध्ये जोरदार चर्चा केली. या जोडप्याने लाईव्ह मॅच दरम्यान असे काही केले जे खूप व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात भारतीय संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लाइव्ह सामन्यात प्रियकराने प्रेयसीला केले प्रपोज

वास्तविक, ही बाब भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाची आहे, जेव्हा भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला होता. यादरम्यान, स्टँडमध्ये असलेल्या एका चाहत्याने त्याच्या मैत्रिणीला कॅमेऱ्यात प्रपोज केले. चांगली गोष्ट म्हणजे प्रेयसीने हा प्रस्ताव स्वीकारला. यानंतर तरुणाने आपल्या प्रेयसीला अंगठी घातली. यावेळी कॅमेराने या दोघांचा आनंद टिपला असून चाहत्यांनी याचा आनंद घेतला.दोन प्रेमी युगुलांमधील हृदयस्पर्शी क्षणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

दुसरीकडे, क्रिकेटबद्दल बोलायचे झाले, तर सध्या ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. विराट कोहली ७८ चेंडूत ४९ धावा करून बाद झाला आहे. तो चांगला संपर्कात होता आणि त्याने आपल्या डावात सात चौकार मारले होते, परंतु त्याने ऑफ-स्टंपच्या बाहेर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि बोलंडच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथने शानदारपणे त्याचा झेल घेतला. रवींद्र जडेजा खाते न उघडताच बाद झाला. बोलंडने त्याला यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीकरवी झेलबाद केले. आता भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. भारताला हा सामना जिंकणे जवळपास अशक्य झाले आहे.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर कसोटीचा गदा कोणाला मिळणार? जाणून घ्या

भारताची मदार ज्याखेळाडूवर होती तो अजिंक्य रहाणे १०८ चेंडूत ४६ धावा करून बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याला यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीकरवी झेलबाद केले. २१३ धावांच्या स्कोअरवर भारताची सातवी विकेट पडली. शार्दुल ठाकूरला नॅथन लायनने बाद केले. त्याने पाच चेंडूंचा सामना केला, मात्र त्याला खाते उघडता आले नाही. या विकेटसह भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आता उमेश यादव श्रीकर भरतसोबत क्रीजवर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple was doing something like this in wtc final match caught on camera video going fiercely viral avw
Show comments