सध्या संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढतो आहे. केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउनमध्ये वाढ केलेली असून वैद्यकीय यंत्रणाही या विषाणूवर लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर करोना विषयी कोणतीही खोटी माहिती पसरवणं कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेलं आहे. तरीही सोशल मीडियावर काही प्रतिष्ठित मंडळी करोनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमावर निशाणा साधत एक वादग्रस्त ट्विट केलं.

Coronavirus : क्रीडाविश्वात हळहळ! महान क्रिडापटूचे उपचारादरम्यान निधन

हे पहा ट्विट –

डॉक्टर्स आणि पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर अझरूद्दीन संतापला, म्हणाला…

यावरून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. पण भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने बबिताचे सौम्य भाषेत कान टोचले. “बबिता मला माफ कर, पण मला असं अजिबात वाटत नाही की कोणताही विषाणू धर्म, जात, पंथ बघून हल्ला करतो. मी तुला विनंती करते की तू तुझं वक्तव्य मागे घ्यावं. आपण भारतासारख्या महान आणि धर्मनिरपेक्ष देशाचे प्रतिनिधित्व करणारे क्रीडापटू आहोत. आपण जेव्हा भारताकडून खेळून जिंकतो, तेव्हा सारेच आपला विजय साजरा करतात”, अशा शब्दात तिने सांगितले. तशाच आशयाचे आणखी एक ट्विटदेखील तिने केले.

लॉकडाउनमध्ये आला वाढदिवस; राहुलला मिळाल्या हटके शुभेच्छा

त्यावर ट्रोल करणाऱ्यांपैकी एकाने ज्वाला गुट्टाचे मत सकारात्मक असल्याचे सांगत बबिता फोगट दहशतवादी आहे असा हॅशटॅग वापरला. त्यावर ज्वाला गुट्टाने त्या नेटकऱ्याला थेट तो हॅशटॅग वापरू नको… डिलीट कर, असं सांगितलं.

दरम्यान, बबिता फोगट हिच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्यावर चहूबाजुंनी टीका केली जात आहे. तसेच तिला काही प्रतिप्रश्नही केले जात आहेत.