CoronaVirus Outbreak : करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. करोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने करोनापासून बचाव करण्यासाठी भारतासह इतर अनेक देश लॉकडाउन आहेत. अशा स्थितीत वैद्यकीय सेवा पुरवणारी दुकाने, मेडिकल स्टोअर्स, रूग्णालये, किराणा मालाची दुकाने अशी काही मोजकी आस्थापनेच चालू आहेत. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांची गैरसोय होताना दिसते आहे. सामान्य नागरिक तर सोडाच, पण भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यावर घरच्या घरीच हेअरकट करण्याची वेळ ओढवली.

सचिनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो पोस्ट केले. या फोटोमध्ये सचिनने एका फोटोत हातात कात्री असल्याचा फोटो टाकला, तर पुढील फोटोंमध्ये त्याने स्वत:चा कशापद्धतीने हेअरकट केला, ते दाखवले. सध्या त्याच्या या नव्या ‘सेल्फ-मेड’ लूकची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

सचिनच्या या हेअरकट प्रकारानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने ‘TrimAtHome’ challenge सुरू केला आहे. आपण सारे घरातच आहोत. अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्याला चांगलं वाटेल, असं काहीतरी केलं पाहिजे. मी स्वत:ची दाढी स्वत:च ट्रीम केली असून एक नवा लूक धारण केला आहे, असे सांगत विराटने साऱ्यांना घरीच दाढी ट्रीम करण्याचे चॅलेंज दिले आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ५० लाखांची आर्थिक मदत केली आहेत. तसेच, तो एका संस्थेमार्फत सुमारे ५००० लोकांच्या जेवणाखाण्याची जबाबदारीदेखील उचलत आहे. याशिवाय विराटनेदेखील करोनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत करणार असल्याची प्रतिज्ञा घेतली आहे.

Story img Loader