CoronaVirus Outbreak : करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. करोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने करोनापासून बचाव करण्यासाठी भारतासह इतर अनेक देश लॉकडाउन आहेत. अशा स्थितीत वैद्यकीय सेवा पुरवणारी दुकाने, मेडिकल स्टोअर्स, रूग्णालये, किराणा मालाची दुकाने अशी काही मोजकी आस्थापनेच चालू आहेत. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांची गैरसोय होताना दिसते आहे. सामान्य नागरिक तर सोडाच, पण खुद्द क्रिकेटच्या देवालादेखील घरच्या घरीच केशकर्तन करायची वेळ ओढावली आहे.

“तो हॅशटॅग वापरायचा नाही… डिलीट कर”; महिला खेळाडूची फॅनला तंबी

भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये सचिनने एका फोटोत हातात कात्री असल्याचा फोटो टाकला आहे, तर पुढील फोटोंमध्ये त्याने स्वत:चा कशापद्धतीने हेअरकट केला आहे, ते दाखवले आहे. सध्या त्याच्या या नव्या ‘सेल्फ-मेड’ लूकची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Coronavirus : क्रीडाविश्वात हळहळ! महान क्रिडापटूचे उपचारादरम्यान निधन

दरम्यान, करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही प्रमाणात लोक करोनातून बरे होत आहेत.

सचिनचा नवा लूक

धोनी ‘कमबॅक’ करू शकेल? टीम इंडियाचा माजी कर्णधार म्हणतो…

अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी पीएम केयर निधीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकार, व्यापारी मंडळी, उद्योगपती, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता करोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावली आहेत. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने यामध्ये आपला वाटा उचलत ५० लाखांची आर्थिक मदत केली असून सध्या तो एका संस्थेमार्फत सुमारे ५००० लोकांच्या जेवणाखाण्याची जबाबदारीदेखील उचलत आहे.

Story img Loader