आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्यासाठी युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी शनिवारचा दिवस हा दुहेरी धक्के देणारा होता. शुक्रवारी संध्याकाळी संघाचा जलदगती गोलंदाज दिपक चहर आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना करोनाची लागण झाली. यानंतर शनिवारी ऋतुराज गायकवाडचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे संघाच्या चिंतेत भर पडली. याचसोबत चेन्नईच्या संघातील महत्वाचा खेळाडू सुरेश रैनानेही यंदाच्या हंगामातून माघार घेतल्यामुळे CSK संघासमोर संकट निर्माण झालं. आयपीएलसाठी महिनाभर आधीपासून तयारी करणारा, चेन्नईच्या ट्रेनिंग कँपमध्ये सहभागी होणाऱ्या रैनाने अचानक माघार घेण्याचा निर्णय का घेतला असेल यावरुन चर्चांचा उधाण आलं होतं. CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सकाळी माहिती देताना रैनाने खासगी कारणांमुळे माघार घेत असल्याचं सांगितलं. परंतू टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, संघातील खेळाडूंना करोनाची झालेली लागण आणि अशा परिस्थितीत ३ महिने घरापासून दूर राहण्याच्या भीतीमुळे सुरेश रैनाने माघार घेण्याचा निर्णय घेतला.
IPL 2020 : करोनाच्या भीतीमुळे सुरेश रैनाची स्पर्धेतून माघार
CSK संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-08-2020 at 22:16 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid fear force suresh raina to quit ipl 2020 says sources psd