क्रिकेट ऑल स्टार्स मालिका
वार्न्स वॉरिअर्सने फलंदाजी आणि एड्र्यू सायमंड्सच्या जबरदस्त गोलंदाजीच्या बळावर क्रिकेट ऑल स्टार्स मालिकेचा दुसरा सामना ५७ धावांनी जिंकला. पहिल्या सामन्यात त्यांनी ब्लास्टर्सला ४ विकेट्सने हरवले होते. या सामन्यानंतर वार्न वॉरियर्सने तीन सामन्यांच्या फ्रेंडली मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. वॉरिअर्सने पहिली फलंदाजी करताना कुमार संगकाराच्या ७७ धावांच्या धुव्वाधार खेळाच्या जोरावर निर्धारित २० षटकात ५ विकेटच्या मोबदल्यात २६२ धावा केल्या होत्या. उत्तरात ब्लास्टर्सचा संघ ८ विकेटच्या मोबदल्यात केवळ २०५ धावाच करू शकला. या मालिकेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला लॉस एंजिलिस येथे खेळला जाणार आहे.
वार्न्स वॉरियर्स- २६२ धावा
याआधी संगकारा ७०, जॅक कॅलिस ४५ व रिकी पाँटिंगच्या ४१ धावांच्या बळावर वार्न्स वॉरिअर्न्सने सचिन्स ब्लास्टर्ससमोर २६३ धावांचे आव्हान ठेवले. ब्लास्टर्सकडून लॉन्स क्लूजनरने दोन, मॅक्ग्राथ, ग्रीम खान आणि सेहवागने एक-एक बळी टिपले. वार्न्स वॉरिअर्सला पहिला झटका स्वानने दिला. मायकल वॉल ग्रीम स्वानने पायचित केले. त्याने २२ चेंडूत ४ चौकार आणि एक षटकार मारत ३० धावा केल्या. यानंतर थोडय़ाच वेळात मॅथ्यू हेडनला ग्लेन मॅक्ग्राथने यष्टीचित केले. हेडनने १५ बॉलमध्ये २ चौकार आणि ३ षटकार मारत ३२ धावा केल्या.
सचिन्स ब्लास्टर्सने नाणेफेक जिंकली
क्रिकेट ऑल स्टार्स मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात सचिन तेंडूलकरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात सेहवाग आणि सचिनच्या दमदार खेळीनंतरही सचिनचा संघ ६ गडय़ांनी पराभूत झाला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत सध्या वार्न्स वॉरियर्स १-० ने समोर आहे. सचिनने त्याच्या संघात सौरभ गांगुलीलाही सामील केले आहे.
वार्न्स वॉरिअर्सने दुसरा सामना ५७ धावांनी जिंकला
या सामन्यानंतर वार्न वॉरियर्सने तीन सामन्यांच्या फ्रेंडली मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-11-2015 at 03:38 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket all stars series 2015 warnes warriors defeat sachins blasters by 57 runs at houston