दिवस-रात्र कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे वारे वाहू लागले असतानाच क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (कॅब) या प्रयोगाची अंमलबजावणी करायचे ठरवले आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेपूर्वी एस. के. आचार्य स्मृती करंडक स्पर्धेची अंतिम फेरी दिवस-रात्र खेळवण्याचा निर्णय ‘कॅब’ने घेतला असून या वेळी गुलाबी रंगाच्या चेंडूचाही वापर करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये बंगाल ‘अ’, बंगाल ‘ब’, ओडिशा आणि झारखंड असे चार संघ खेळवण्यात येणार असून ही स्पर्धा १५ सप्टेंबरपासून सुरू होईल. स्पर्धेची चारदिवसीय अंतिम फेरी १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान ईडन गार्डन्सवर होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा