Cricket Australia Choose Test Team of the Year : २०२३ हे वर्ष आता निरोप घेण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, मागील वर्षातील कामगिरीच्या आधारे वर्षातील सर्वोत्तम संघ उदयास येत आहेत. अनेक माजी क्रिकेटपटू आणि क्रीडा मंच आपापल्या संघांची निलड करत आहेत. याच मालिकेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला २०२३ सालचा कसोटी संघ जाहीर केला आहे. या संघात दोन भारतीय खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे. पण विशेष बाब म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या वर्षातील कसोटी संघात विराट कोहली आणि रोहित शर्माला स्थान दिलेले नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते दोन भारतीय कोण आहेत? चला तर मग जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या फिरकीपटूंना मिळाले स्थान –

रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी वर्षानुवर्षे कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी दमदार कामगिरी केली आहे. २०२३ मध्येही दोघांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. यामुळेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दोघांचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघात समावेश केला आहे. अश्विनने यावर्षी ७ सामन्यात ४१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने अर्धशतकही केले आहे. त्याचबरोबर जडेजाने वर्षभरात ७ सामने खेळताना दोन अर्धशतकांच्या मदतीने २८१ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ३३ विकेट्सही आहेत.

या संघाची एक खास गोष्ट म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या फक्त दोनच खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. या संघात फक्त उस्मान ख्वाजा आणि पॅट कमिन्स आहेत. त्याच वेळी, इंग्लंडचे सर्वाधिक तीन खेळाडू या संघाचा भाग आहेत. तसेच न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडच्या प्रत्येकी एका खेळाडूला या संघात स्थान मिळाले आहे. हा संघ बर्‍याच प्रमाणात चांगला दिसतो. कारण त्यात फक्त एका देशाचे ५-६ खेळाडू नाहीत.

हेही वाचा – Test Team 2023 : आकाश चोप्राने निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’, फक्त ‘या’ चार भारतीय खेळाडूंना दिले स्थान

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्लेइंग इलेव्हनमध्ये उस्मान ख्वाजा आणि दिमुथ करुणारत्ने यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. करुणारत्नेने २०२३ मध्ये ६०.८०च्या सरासरीने ६०८ धावा केल्या. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवड करण्यात आली आहे. त्याने यावर्षी सात सामन्यांत ६९६ धावा केल्या. यानंतर मधल्या फळीत फलंदाजीसाठी इंग्लंडच्या जो रूट आणि हॅरी ब्रूकची निवड करण्यात आली आहे. २०२३ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये या दोन्ही खेळाडूंची कामगिरी चांगली होती. जवळपास ४४ च्या सरासरीने धावा करणाऱ्या आयर्लंडच्या लॉर्कन टकरची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

पॅट कमिन्सची वेगवान गोलंदाजी विभागात निवड झाली असून तो या संघाचा कर्णधारही असेल. कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आणि अॅशेस मालिकेतही चांगली कामगिरी केली. याशिवाय पाकिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पॅट कमिन्सची कामगिरी चांगलीच होती. दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड यांचीही निवड झाली आहे. स्टुअर्ट ब्रॉडने यावर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

हेही वाचा – Year Ender 2023 : टीम इंडिया विश्वचषक विजेत्याला ऑस्ट्रेलियाला मागे टाकत ठरली अव्वल, २०२३ मध्ये केला ‘हा’ खास पराक्रम

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी इलेव्हन :

उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, केन विल्यमसन, जो रूट, हॅरी ब्रूक, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, पॅट कमिन्स (कर्णधार), कागिसो रबाडा आणि स्टुअर्ट ब्रॉड.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket australia names ravichandran ashwin and ravindra jadeja in test team of the year 2023 vbm