क्रिकेट समालोचक हे सामन्यांदरम्यान अनेकवेळा असे काही बोलून जातात, जे व्हायरल होते. काही समालोचक ट्वीट करून नवा वाद निर्माण करतात. यात सर्वात परिचित नाव म्हणजे संजय मांजरेकर. अनेकवेळा आपल्या वक्तव्यामुळे आणि ट्वीटमुळे मांजरेकर चर्चेचा विषय ठरतात. पण त्यांच्याव्यतिरिक्त आणखी असे काही समालोचक आहेत, ज्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या.
संजय मांजरेकर
संजय मांजरेकर आणि क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांचा वाद क्रिकेट चाहत्यांसाठी नवा नाही. या दोघांनी आपली भांडणे सोशल मीडियापर्यंत आणली होती. २०१९च्या वर्ल्डकपदरम्यान मांजरेकरांनी जडेजाला “bits and pieces” असे म्हटले होते. त्यानंतर जडेजाने न्यूझीलंडविरुद्ध दमदार खेळी करून मांजरेकरांना ट्विटरवर गप्प केले.
Still i have played twice the number of matches you have played and i m still playing. Learn to respect ppl who have achieved.i have heard enough of your verbal diarrhoea.@sanjaymanjrekar
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) July 3, 2019
जेफरी बॉयकॉट
समालोचक जेफ्री बॉयकॉट यांनी महिला क्रिकेटविषयी लैंगिक टिपणी केली होती. पुरुष क्रिकेटच्या तीव्रतेशी जुळत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. ”आपल्याला आवश्यक दबाव, भावना आणि तंत्र माहीत असणे आवश्यक आहे. पुस्तक वाचून किंवा क्लब क्लब, द्वितीय इलेव्हन क्रिकेट किंवा महिलांचे क्रिकेट खेळल्यामुळे हे शिकू शकता, असे मला वाटत नाही. पुरुषांच्या क्रिकेटच्या सामर्थ्याशी आणि वेगाशी महिला तुलना करू शकत नाही”, असे बॉयकॉट यांनी म्हटले होते.
रसेल आर्नोल्ड
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू रसेल आर्नोल्डनेही एक वादग्रस्त ट्वीट केले होते. २०१८मध्ये भारताचा कसोटीत ६० धावांनी पराभव झाला होता. कसोटी अजूनही पाच दिवसांची असते, असे आर्नोल्डने ट्वीट करत म्हटले होते.
हेही वाचा – VIDEO : राशिद खानने बॅटने नव्हे, तर गोल्फ स्टीकने खेळला हेलिकॉप्टर शॉट!
डीन जोन्स
दिवंगत समालोचक डीन जोन्स यांनीही दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू हशिम अमलाबद्दल एक धक्कादायक विधान केले होते. अमलाला जोन्स यांनी दहशतवादी म्हटले होते. या वक्तव्यानंतर जोन्स यांची टेन स्पोर्ट्समधून हकालपट्टी करण्यात आली होती.
कॅरी ओकीफ
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक कॅरी ओकीफ यांनी मयांक अग्रवालवर टीका केली होती. मयांकने रेल्वे कॅन्टीन स्टाफच्या विरुद्ध त्रिशकत झळकावले, असे म्हणत ओकीफ यांनी त्याची खिल्ली उडवली होती. विराट कोहली आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या सडेतोड उत्तरानंतर ओकीफ यांनी आपली चूक मान्य केली.