अ‍ॅशेस कसोटी मालिकेच्या पहिल्या सामनाच्या दुसऱया दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडच्या संघाला अवघ्या १३६ धावांत गारद केले आहे.
आज शुक्रवार ऑस्ट्रेलियाच्या २९५ धावांचा पाठलाग करत असताना इंग्लंडचा डाव अवघ्या १३६ धावांत आटोपला. इंग्लंडकडून मायकेल कॅरबेरीने ४० आणि स्टुअर्ट ब्रॉड ३२ धावा या दोघांना वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांच्या वर मजल मारता आली नाही.
आता इंग्लंडचा संघ १५९ धावांनी पछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल जॉन्सनने सर्वाधिक ४ तर, हॅरिसने ३, नॅथन लियॉनने २ तर पीटर सिडलने १ बळी मिळविला.

Story img Loader