विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या रोमहर्षक अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिल्याने सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला विश्वचषक २०१९ चा मालिकावीर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विश्वचषक स्पर्धेत ५७८ धावा करत आपल्या नेतृत्वाच्या जोरावर संघाला अंतिम सामन्यामध्ये नेणाऱ्या केनला हा पुरस्कार सचिन तेंडुलकरच्या हस्ते देण्यात आला. अंतीम सामन्यातील खेळीने केन हा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला. श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला मागे टाकत त्याने सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. २००७ साली श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धनने ५४८ धावा केल्या होत्या. विल्यमसनने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ३० धावांची खेळी करत केनने हा विक्रम आपल्या नावे जमा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिशय रोमहर्षक झालेले अंतीम सामन्यात नशिबाने साथ न दिल्याने पराभव पदरी पडल्यानंतर केनच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य कॅमेरामध्ये टिपले गेले. केनच्या याच कृतीवर नेटकरी फिदा झाले असून अनेकांनी ट्विटवरुन केनच्या या खिळाडूवृत्तीला दाद दिली आहे. ‘तुमच्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची चर्चा अधिक आहे’ या वक्तव्यानुसार इंग्लंडच्या विजयानंतरही ट्विटवर केन विल्यमसनच्याच नावाची सर्वाधिक चर्चा आहे. अनेकांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतरही पराभव शांतपणे स्वीकारत हसणाऱ्या केनची मुद्रा पाहून केन तर धोनीपेक्षाही शांत (कूल) असल्याचे म्हटले आहे. भारतीय चाहाते तर केनच्या कूलनेसवर खूपच भाळले आहेत. त्यामुळेच भारतामध्ये ट्विटवर #KaneWilliamson हा हॅशटॅग दुसऱ्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसत आहेत. पाहुयात केनबद्दलची काही खास ट्विटस

१)
धोनीहून कूल

२)
धोनी कूल तर हा सुपर कूल

३)
धोनी सारखाच

४)
नवा कॅप्टन कूल

५)
द्रविड धोनी अन् केन

६)
धोनी अन् कोहलीपेक्षा सरस

७)
द्रविड गेला तेव्हा धोनी आला आता धोनी जातोय तर

८)
योग्य निवड

९)
कणखर नेतृत्व

१०)
मौल्यवान हास्य

११)
खरा विजेता हाच

१२)
मी हसणार कारण…

१३)
खरा हिरो

१४)
खिळाडूवृत्ती

१५)
मोठा माणूस

१६)
योद्धा आणि बावळट नियम

१७)
सर्व शक्तीमान

१८)
या सारख्या खेळाडूंमुळेच हा सभ्य लोकांचा खेळ

१९)
असा कसा वेगळा…

२०)
आयुष्यात इतकचं हवयं…

२१)
प्रेमात…

२२)
प्रेम प्रेम आणि खूप सारं प्रेम

२३)
हे हास्य

२४)
बाजीगर

२५)
उत्तम उदाहरण

२६)
न्यूझीलंडला समर्थन याच्यामुळेच

२७)
काय जिकंल

२८)
सर्वात भारी कर्णधार

२९)
कॅप्टन कूल आणि कॅप्टन फॅनटॅस्टीक

३०)
कोण मी

दरम्यान, इंग्लंडने पहिल्यांच विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. इंग्लंच्या विजयाबरोबरच जगाला क्रिकेटमधील नवा विश्वविजेता मिळाला आहे.