भारतीय सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर चौथ्या कसोटीत शानदार कामगिरी करताना शतक झळकावले. रोहितने मोईन अलीच्या चेंडूवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले, जे परदेशी भूमीवरील कसोटीतील त्याचे पहिले शतक आहे. रोहितने षटकार मारून आपले शतक पूर्ण करताच कर्णधार विराट कोहलीसह टीम इंडियाचे इतर खेळाडू टाळ्या वाजवताना दिसले. यावेळी रोहितची पत्नी रितिकाही स्टेडियममध्ये उपस्थित होती. तीने उभी राहून टाळ्या वाजवत त्याच्या कामगिरीला दाद दिली.
आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात रोहित सध्या जागतिक दर्जाच्या इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत आहे. रोहितने मोईन अलीच्या चेंडूवर षटकार लगावत आपले शतक पुर्ण केले. त्यानंतर, रोहित मैदानावर त्याच्यासोबत असलेला चेतेश्वर पुजारा याच्याशी हस्तांदोलन करतो आणि त्याला मिठी मारतो. विराट कोहलीसह प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील रोहितचे विशेष कौतूक केले आहे.
रोहितने आपले शतक पुर्ण करताच रितिकाने स्टेडियममधून त्याला जोरदार प्रोत्साहन सोबत प्रेम दिले. रितिकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रोहितने आपले शतक पूर्ण करताच रितिकाने त्याला फ्लाइंग किस दिला. दरम्यान, चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडला ३६८ धावांचे लक्ष्य दिले. मात्र इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून भारताला चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे अखेरच्या दिवशी कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ओव्हल येथे सुरू असलेल्या या कसोटीतील चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद ७७ धावा केल्या असून त्यांना विजयासाठी आणखी २९१ धावांची आवश्यकता आहे. हसीब हमीद ४३, तर रॉरी बर्न्स ३१ धावांवर खेळत आहे.
Ritika Bhabhi ji always Supported Rohit in Bad Phases
Please everyone just like for this Great Lady pic.twitter.com/EkQx83JGJp
— LOVER (@ILoveYouJanu143) September 5, 2021
रोहितने रचले रेकॉर्डवर रेकॉर्ड!
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात सलामीवीर म्हणून ११,००० धावा पूर्ण केल्या आहेत. सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ११,००० धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. यात रोहितने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनचा विक्रम मोडला.
सलामीवीर म्हणून रोहितने २४६ डावांमध्ये ११,००० धावा पूर्ण केल्या. त्याने २५१ डावांमध्ये ११,००० धावा करणाऱ्या हेडनचा विक्रम मोडला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात कमी डावात ११,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने २४१ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.