Los Angeles Olympics 2028: लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ मध्ये होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ प्रथमच सहभागी होऊ शकतो. जंटलमन्स गेम अशी ओळख असणाऱ्या क्रिकेट या खेळाचा तब्बल १२८ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये समावेश होणार आहे. मात्र त्यासाठी अजून ५ वर्षांच्या कालावधी असून २०२८ साली अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे. ‘द गार्डियन’मधील वृत्तानुसार, पुरुष आणि महिला संघ टी२० क्रिकेट स्पर्धा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी पात्र ठरतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
क्रिकेटबद्दल जर बोलायचे झाले तर हा खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळला गेला आहे. १९०० मध्ये क्रिकेटला या खेळांच्या महाकुंभात स्थान मिळाले होते. आता १२८ वर्षांनंतर ते पुन्हा ऑलिम्पिकमध्ये परत येऊ शकते. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट या खेळाचा समावेश होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट हे टी२० फॉर्मेटमध्ये खेळले जाईल. १९०० मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटच्या आधारावर त्याचे आयोजन करण्यात आले होते. आता २०२८ व्यतिरिक्त क्रिकेटला २०२३२च्या ब्रिस्बेन ऑलिम्पिकमध्येही स्थान मिळण्याची शक्यता आहे. प्रसारण हक्कातून मिळणारे उत्पन्न हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते.
गार्डियनच्या वृत्तानुसार, महिला आणि पुरुष क्रिकेटला २०२८च्या लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळू शकते. टी२० फॉरमॅटच्या आधारे त्याचे आयोजन केले जाईल. मात्र, दोन्ही गटात केवळ ५-५ संघांनाच संधी दिली जाईल. अशा स्थितीत अनेक मोठ्या संघांना संधी मिळत नाही. आयसीसी क्रमवारीच्या आधारे संघ ठरवले जाऊ शकतात. यापूर्वी २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता, तेव्हापासून ऑलिम्पिकमध्ये त्याच्या समावेश करण्याची चर्चा सुरु आहे.
ब्रॉडकास्टर्सच्या राईट्समध्ये १० पट वाढ होण्याची अपेक्षा आहे
पॅरिसमध्ये २०२४ ऑलिम्पिकसाठी भारतातील प्रसारण हक्क सुमारे १६५ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. २०२८ आणि २०२३च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्यास ब्रॉडकास्टरला हक्कातून सुमारे १६०० कोटी रुपये मिळू शकतात. म्हणजेच १० पट अधिक नफा वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत.
९ खेळांची निवड करण्यात आली आहे
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकमध्ये, क्रिकेटसह ९ खेळांना २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी निवडण्यात आले आहे. क्रिकेट व्यतिरिक्त, यात बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस, ब्रेक डान्सिंग, कराटे, किक बॉक्सिंग, स्क्वॅश आणि मोटरस्पोर्ट्सचा समावेश आहे. या वर्षाच्या अखेरीस क्रिकेटबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
प्रथमच टी२० स्वरुपात क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होणार
पुढील वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी२० विश्वचषक होणार आहे. पण पायाभूत सुविधांअभावी ते इंग्लंडला हलवले जाऊ शकते. मात्र, अद्याप यासंदर्भात आयसीसी आणि ईसीबीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करायचा की वगळायचा याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. अमेरिकेतही क्रिकेटची लोकप्रियता वाढत आहे.
प्रथमच फ्रँचायझी टी२० लीग म्हणजेच मेजर लीग क्रिकेटचे आयोजन तेथे केले जात आहे. यामध्ये आयपीएल फ्रँचायझीही आपले संघ उतरवत आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सपासून चेन्नई सुपर किंग्जपर्यंतचा समावेश आहे. जगभरातील अनेक खेळाडू निवृत्तीनंतर चांगल्या संधीच्या शोधात अमेरिकेत पोहोचले आहेत. कर्णधार म्हणून भारताला अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदचाही यात समावेश आहे.
ब्रिटनने सुवर्णपदक जिंकले होते
१९०० मध्ये ऑलिम्पिकमधील क्रिकेटबद्दल जर बोलायचे झाले तर, बेल्जियम, फ्रान्स, ब्रिटन आणि नेदरलँड्स ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करणार होते. पण बेल्जियम आणि नेदरलँड्सने माघार घेतली. यानंतर सुवर्ण आणि रौप्य पदकांचा निर्णय फक्त २ संघांमधील सामन्याने झाला. पहिल्या डावात ११७ धावा करून ब्रिटनचा संघ सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात फ्रान्सचा संघ ७८ धावांवर गारद झाला. ब्रिटनने ५ बाद १४५ धावा करून दुसरा डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात फ्रान्सचा संघ दुसऱ्या डावात केवळ २६ धावाच करू शकला. अशाप्रकारे हा सामना १५८ धावांनी जिंकून ब्रिटनने ऑलिम्पिकमधील एकमेव सुवर्णपदक जिंकले आहे.