२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारताने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ८९ धावांनी मात केली. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानवरील हा सातवा विजय ठरला. सामन्यात बाजी मारल्यानंतर सर्व देशभरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. मात्र अशा परिस्थितीतही टीम इंडियाची चिंता अजुनही कायम आहे.
भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार पायाचे स्थायू बिघडल्यामुळे पुढील २-३ सामने खेळू शकणार नाही. गोलंदाजी करत असताना संघाच्या पाचव्या षटकादरम्यान हा घटनाक्रम घडला. “भुवनेश्वरचे स्नायू पुन्हा दुखावले आहेत, किमान पुढील २-३ सामने तो खेळू शकणार नाही. त्याला झालेली दुखापत फारशी गंभीर नसली तरीही आम्ही शमीच्या पर्याय कायम ठेवला आहे.” सामना संपल्यानंतर समालोचक संजय मांजरेकर यांच्याशी संवाद साधताना विराट कोहलीने ही माती दिली.
दरम्यान चार चेंडू टाकून झाल्यानंतर दुखण वाढल्यामुळे भुवनेश्वर कुमारने मैदानाबाहेर जाण पसंत केलं. त्याच्या षटकारेच उरलेले दोन चेंडू टाकण्यासाठी विजय शंकरने टाकले. यावेळी आपल्या पहिल्याच चेंडुवर बळी घेत विजय शंकरने इतिहासात विक्रमी कामगिरीच नोंद केली आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत कोणत्या खेळाडूला संघात स्थान देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.