डेव्हिड वॉर्नरच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ३८१ धावांचा डोंगर उभा केला. वॉर्नरने कर्णधार अरॉन फिंच, उस्मान ख्वाजा यांच्यासोबत महत्वाची भागीदारी रचली. बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत वॉर्नरने १६६ धावांची खएळी केली. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.

यादरम्यान वॉर्नरने २०१९ विश्वचषक स्पर्धेतील वय्यक्तिक सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजाचा मान पटकावला आहे. आपला कर्णधार फिंचला मागे टाकत वॉर्नर आतापर्यंत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. या खेळीत वॉर्नरने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

१) विश्वचषक इतिहासात दोनवेळा १५० पेक्षा जास्त धावा करणारा वॉर्नर पहिला फलंदाज ठरला आहे.

२) २०१९ विश्वचषक स्पर्धेत डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक वय्यक्तिक धावसंख्या करणारा फलंदाज ठरला आहे. (बांगलादेशविरुद्ध सामन्यात १६६ धावा)

अवश्य वाचा – Aus vs Ban : सोळावं शतक मोक्याचं, धवनला मागे टाकत वॉर्नर ठरला ‘गब्बर’

३) डेव्हिड वॉर्नर आणि अरॉन फिंच जोडीने २०१९ विश्वचषक स्पर्धेत पाचव्या अर्धशतकी भागीदारीची नोंद केली आहे. याव्यतिरीक्त कोणत्याही जोडीच्या नावावर ३ पेक्षा जास्त अर्धशतकी भागीदाऱ्यांची नोंद नाहीये.

४) वन-डे क्रिकेटच्या इतिहासात ६ वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात दीडशतकी खेळी करणारा वॉर्नर पहिला फलंदाज ठरला आहे.

Story img Loader