बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. बांगलादेशविरुद्ध सामन्यात डेव्हिड वॉर्नरने शतक झळकावत, आपल्या संघाला दमदार सुरुवात करुन दिली. डेव्हिड वॉर्नरचं वन-डे क्रिकेटमधलं हे १६ वं शतक ठरलं आहे. सर्वात कमी डावांमध्ये १६ वं शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नर तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने शिखर धवनचा विक्रम मोडीत काढला आहे. शिखरने १२६ डावांमध्ये १६ वं शतक ठोकलं होतं, तर वॉर्नरने केवळ ११० डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली.

डेव्हिड वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी कर्णधार अरॉन फिंच याच्यासोबत १२१ धावांची भागीदारी केली. बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत वॉर्नरने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत शतक झळकावलं.