२०१९ विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने सुपरओव्हरमध्ये बाजी मारली आहे. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांनी बरोबरी साधल्यामुळे सामना सुपरओव्हरमध्ये खेळवण्यात आला. सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होता. मात्र शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची आवश्यकता असताना, मार्टीन गप्टील धावबाद झाला, आणि इंग्लंडने सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर सामन्यात बाजी मारली.

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अनेक निर्णायक प्रसंग आले. मात्र बेन स्टोक्स अखेरच्या षटकात फलंदाजी करत असताना, न्यूझीलंडच्या खेळाडूने केलेला थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. न्यूझीलंडच्या या दुर्दैवी थ्रोमुळे इंग्लंडला मोफतच्या ४ धावा मिळाल्या, आणि याच प्रसंगानंतर सामना न्यूझीलंडच्या हातून निसटला.

पाहा या घटनेचा व्हिडीओ…..

इंग्लंडचं विश्वचषक स्पर्धेतलं हे पहिलं विजेतेपद ठरलं. जगाला क्रिकेट खेळ शिकवणारा इंग्लंड देश आतापर्यंत वन-डे विश्वचषकाचं विजेतेपद पटकावू शकला नव्हता. मात्र इयॉन मॉर्गनच्या संघाने ऐतिहासीक लॉर्ड्सच्या मैदानावर विजेतेपद पटकावत इतिहासाची नोंद केली.

Story img Loader