कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली यजमान इंग्लंडच्या संघाने अंतिम फेरीत बाजी मारत विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. विजयासाठी २४२ धावांचं आव्हान मिळालेल्या इंग्लंडच्या संघाला निर्धारित वेळेत सामना जिंकता आला नाही. ५० षटकांनंतर हा सामना अनिर्णित अवस्थेत राहिल्यामुळे सुपरओव्हर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

२०१९ विश्वचषक स्पर्धेतली ही पहिली सुपरओव्हर ठरली आहे. याचसोबत विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेत अंतिम सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लागण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. इंग्लंडने सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडसमोर १६ धावांचं आव्हान ठेवलं.

पाहा इंग्लंडची सुपरओव्हरमधली फलंदाजी – 

या धावसंख्येचा पाठलाग करताना निशम आणि गप्टील हे फलंदाज मैदानावर उतरले होते. निशमने फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ आणून सोडलं. मात्र अखेरच्या चेंडूवर दोन धावा काढणं मार्टीन गप्टीलला जमलं नाही, अखेरीस सर्वाधिक चौकार मारण्याच्या निकषावर इंग्लंडचा संघ विजयी ठरला.

अखेर इंग्लंडची सामन्यात बाजी – 

वन-डे विश्वचषक स्पर्धेतलं इंग्लंडचं हे पहिलं विजेतेपद ठरलं आहे. बेन स्टोक्सला त्याच्या धडाकेबाज आक्रमक अर्धशतकी खेळीसाठी सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

Story img Loader