२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्या सामन्यात आफ्रिकेवर मात करत आश्वासक सुरुवात केली. लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणाऱ्या सामन्यादरम्यान, भारतामध्ये बँकाना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या विजय मल्ल्यानेही हजेरी लावली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने विजय मल्ल्याचे मैदानात जातानाचे फोटो शेअर केले आहेत.

यावेळी विजय मल्ल्याची प्रतिक्रीया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांनी प्रयत्न केला. मात्र मी सामना पाहण्यासाठी आलो आहे, असं म्हणत मल्ल्याने अधिक काही बोलण्यास नकार दिला. दरम्यान भारत आणि ब्रिटन सरकारमध्ये विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावरुन वाटाघाटी सुरु आहेत.

Story img Loader