२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासमोरची संकट काही केल्या कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे सलामीवीर शिखर धवन १०-१२ दिवसांसाठी संघाबाहेर गेला आहे. त्यातच पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापत झालेली आहे.
भारताकडून पाचवे षटक टाकत असताना भुवनेश्वरने ४ चेंडू टाकले. चौथ्या चेंडूदरम्यान आपल्याला त्रास होत असल्याचं भुवनेश्वरला जाणवलं, त्यानंतर भुवनेश्वर थेट मैदानाबाहेर गेला. त्याचे स्नायू दुखावल्याची माहिती समोर येते आहे, त्यामुळे भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानविरुद्ध उर्वरित सामन्यात मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
Bhuvneshwar Kumar will not return to the field in this match. He has tightness in his left hamstring.https://t.co/n0eD4zAHyQ #INDvPAK #CWC19 pic.twitter.com/T96W8RnFvo
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 16, 2019
दरम्यान भुवनेश्वर कुमार माघारी परतल्यानंतर विजय शंकरने उरलेलं षटक पूर्ण केलं. यावेळी पहिलाच चेंडू टाकताना शंकरने इमाम उल-हकला पायचीत करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला.