भारतीय संघाचा सलामीवीर सध्याच्या विश्वचषक स्पर्धेच चांगल्याच फॉर्मात आहे. सलामीच्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर, रोहितने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही शतकी खेळीची नोंद केली आहे. पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेताना रोहित शर्माने ८५ चेंडूमध्ये शतकाची नोंद केली. या कामगिरीसह रोहित शर्मा विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.
Fastest WC 100s for India:
81 Sehwag v Bermuda
83 Kohli v Ban
84 Sachin v Kenya
84 Dhawan v Ireland
85 ROHIT v PAK#IndvPak #CWC19— Bharath Seervi (@SeerviBharath) June 16, 2019
या यादीमध्ये विरेंद्र सेहवाग ८१ चेंडूत झळकावलेल्या शतकासह पहिल्या स्थानावर आहे.
अवश्य वाचा – Ind vs Pak : रोहितकडून पाकच्या गोलंदाजांची धुलाई, मानाच्या खेळाडूंच्या पंगतीत मिळवलं स्थान
दरम्यान, सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहित शर्माने लोकेश राहुलच्या सोबतीने शतकी भागीदारी रचली. पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी रचत रोहितने भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली.