चंद्रकांत पंडित
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, तशाच खेळाच्याही दोन बाजू असू शकतात. एक बाजू अशी की, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ झगडताना आढळला, तेव्हा खूप लोकांच्या मनात नाराजी दिसत होती. अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेत कमकुवत असल्यामुळे भारताकडून जी अपेक्षा होती तसा खेळ झाला नाही, तर दुसरी बाजू म्हणजे दोन दिवसांनंतर वेस्ट इंडिजविरुद्ध जेव्हा भारत खेळला, तेव्हा अफगाणिस्तानइतका हा संघ कमकुवत नव्हता. परंतु संघ म्हणून त्यांची कामगिरी पाहिजे तशी झाली नाही. विंडीजच्या प्रत्येक फलंदाजाकडे सामना जिंकण्याची पात्रता होती. वेस्ट इंडिजशी भारताचा सामना एकतर्फी झाला. केवळ फलंदाजांनीच नव्हे, तर भारताच्या गोलंदाजांनीसुद्धा वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना नेस्तनाबूत केले.
मँचेस्टर हे मैदान इंग्लंडमध्ये असले तरी भारतामध्येच खेळल्याचा आपलेपणा भारतीय संघाला येथे मिळत असावा. ३६ वर्षांपूर्वी भारताने २५ जून १९८३ या दिवशी इंग्लंडमध्ये विश्वचषक जिंकला होता. सर्व भारतीयांच्या अपेक्षा आहेत की भारताने अंतिम सामना जिंकून विश्वचषक भारतात आणावा. उपांत्य फेरी गाठण्याकडे भारतीय संघाने वाटचाल केली आहे. परंतु त्यासाठी उर्वरित सामन्यांमध्ये याच कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. भारताकडे एक जमेची बाजू आहे, ती म्हणजे गोलंदाजांची. या विजयामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
या विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांत ३००-३५० धावा सहज होत होत्या. परंतु गेल्या काही सामन्यांमध्ये २२५-२७० धावांवरच बऱ्याच संघांना समाधान मानावे लागत आहे. कारण सुरुवातीला खेळपट्टी नवीन होती, परंतु आता खेळून-खेळून त्या धिम्या गतीच्या झाल्या आहेत. त्यामुळे फलंदाजांसाठी अवघड प्रसंग निर्माण झाला आहे. एखादा चांगला संघ चांगले फलंदाज असतानासुद्धा त्यांच्याकडून ४०-५० धावा कमी होत आहेत. भारताची फलंदाजी चांगली आहे म्हणून ते इतका मोठा पल्ला गाठत आहे. विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, लोकेश राहुल, हार्दिक पंडय़ा या चार खेळाडूंच्या चांगल्या फलंदाजीमुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात २६८ धावांपर्यंत मजल मारली. वेस्ट इंडिजमधील ख्रिस गेल, शाय होप यांची विश्वचषकातील धावांची सरासरी जरी चांगली असली तरी भारतीय गोलंदाजांसमोर ते आपला जम बसवू शकले नाही. नामवंत खेळाडूंना वाटत होते की या सामन्यात भुवनेश्वर कुमारला खेळवायला पाहिजे होते. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात मोहम्मद शमीने साकारलेल्या हॅट्ट्रिकमुळे त्याचा आत्मविश्वास उंचावलेला होता. त्याची जिद्द अजून वाढली आहे. त्यामुळे शमीनेच या सामन्यात खेळले पाहिजे, हा प्रशिक्षक आणि कर्णधाराने घेतलेला निर्णय मला योग्य वाटला.
शमी आणि जसप्रीत बुमराची जोडी प्रतिस्पर्धी संघांसाठी धोकादायक ठरत आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्याला कलाटणी देण्यामध्ये शमी आणि बुमराचा मोठा वाटा होता. तेच पुन्हा एकदा या जोडीने वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात सिद्ध करून दाखवले. एकापाठोपाठ एक फलंदाजांना त्यांनी तंबूत परत पाठवले. यजुर्वेद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी त्यांना चांगली साथ दिली, म्हणूनच वेस्ट इंडिजचा संघ मोठय़ा धावसंख्येने भारताच्या मागे पडला. हाच आत्मविश्वास भारत असाच पुढे घेऊन जाईल. भारताने विश्वचषक जिंकण्याच्या दृष्टीने वाटचाल करत विजयी घोडदौड अशीच कायम ठेवावी.
चौथ्या क्रमांकावरील फलंदाज हा एकमेव प्रश्न भारतीय संघासमोर आहे. विजय शंकर हा चांगला खेळाडू असला तरी किती योगदान देऊ शकतो, हे भारताच्या दृष्टीने पुढच्या सामन्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. इंग्लडसोबत होणारा पुढील सामना आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. इंग्लंडसारख्या संघावर आपल्याला मात करायची असेल, तर चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूने चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. याआधीच्या सामन्यांत केलेल्या ३००-३५० धावसंख्येपर्यंत भारताला पुन्हा सहज मजल मारता येईल. त्यासाठी रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक या फलंदाजांचा विचार केला जाऊ शकतो.