दीपक जोशी

२००९पासून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळायला सुरुवात करणारा अफगाणिस्तानचा संघ भारताविरुद्ध दोनच सामने खेळला आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत २०१४ आणि २०१८ मध्ये झालेल्या या दोन संघांमधील सामन्यांत भारताने एक सामना जिंकला व एक सामना ‘टाय’ झाला आहे. मात्र विश्वचषकात उभय संघ शनिवारी प्रथमच सामना करणार आहेत. अफगाणिस्तानचा संघ गेल्या दहा वर्षांच्या एकदिवसीय कारकीर्दीतील १२०वा सामना खेळत असून, यापैकी ५९ विजय व ५६ पराभव पत्करले आहेत. याचप्रमाणे भारतीय संघ विश्वचषकात ७८ सामने खेळला असून, शनिवारी अफगाणिस्तानला हरवून अर्धशतकी विजय साकारण्यास उत्सुक आहे.

Story img Loader