जसप्रीत बुमराहने गेल्या वर्षभराच्या कालखंडात भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून संघातलं आपलं स्थान पक्क केलं आहे. जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान मिळवलेला बुमराह, सध्या सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. आपल्या भेदक यॉर्कर गोलंदाजीच्या जोरावर बुमराहने आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहेय. अखेरच्या षटकांमध्ये बुमराहचा हाच भेदक मारा भारतासाठी महत्वाचा ठरत आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : दोन विश्वचषक स्पर्धा आणि मार्टीन गप्टीलची अधोगती

२०१९ विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराह सर्वाधिक निर्धाव षटकं टाकणारा गोलंदाज ठरला आहे. इतर सर्व भारतीय गोलंदाजांची निर्धाव षटकं मोजली तर ती केवळ ६ पर्यंत पोहचत आहेत. या आकडेवारीवरुन बुमराहचा मारा प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी किती डोकेदुखीचा ठरतोय हे समजून येतंय.

न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यातही बुमराहने आपली चमक दाखवली. न्यूझीलंडच्या फलंदाजांवर अंकुश लावत बुमराहने पहिला स्पेल टाकताना मार्टीन गप्टीलचा एक महत्वाचा बळी घेतला. पहिल्या स्पेलमध्ये बुमराहने ४ षटकांमध्ये १ षटक निर्धाव टाकत केवळ १० धावा देत १ बळी घेतला.

Story img Loader