२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासमोर उपांत्य फेरीमध्ये न्यूझीलंडचं आव्हान आहे. पाकिस्तानचा संघ साखळी फेरीत आपले अखेरचे तिन्ही सामने जिंकूनही अपेक्षित रनरेट न राखू शकल्यामुळे न्यूझीलंडचा संघ मागच्या दाराने उपांत्य फेरीत दाखल झाला. २०१५ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगला. मात्र न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टीन गप्टीलसाठी ही स्पर्धा फारशी चांगली जात नाहीये.

२०१५ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा मार्टीन गप्टील यंदाच्या स्पर्धेत आपला फॉर्म कायम राखण्यासाठी झगडतो आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत गप्टील सर्वात खराब सरासरी असलेला सलामीवीर फलंदाज ठरला आहे.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. मार्टीन गप्टीलने पहिली धाव काढण्यासाठी तब्बल १४ चेंडू खर्ची घातले. जसप्रीत बुमराहच्या एका उसळत्या चेंडूवर बचावात्मक फटका खेळण्याच्या प्रयत्नात गप्टील स्लिपमध्ये विराट कोहलीच्या हाती झेल देऊन माघारी परतला.

Story img Loader