विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. भारतीय संघाकडून गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमीने आपली कामगिरी चोख बजावत, साखळी फेरीत भारताला अव्वल स्थानी ठेवण्यात महत्वाचा वाटा उचलला.

उपांत्य सामन्यात मोहम्मद शमीला भारतीय संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर बरीच टीकाही झाली. मात्र शमीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, सर्व भारतीय चाहत्यांचे आभार मानले आहेत.

शमीने अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यात हॅटट्रीकची नोंद केली होती. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात हॅटट्रीकची नोंद करणारा शमी दुसरा भारतीय गोलंदाज ठरला होता.

Story img Loader