न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा यष्टिरक्षक सर्फराज अहमदने अप्रतिम झेल टिपत सर्वाची वाहवा मिळवली होती; पण वेस्ट इंडिजविरुद्ध महेंद्रसिंह धोनीने हवेत सूर घेत कालरेस ब्रेथवेटचा अप्रतिम झेल टिपल्यामुळे या दोघांमधील कुणाचा झेल सरस, अशी चर्चा सध्या समाजमाध्यमांवर रंगली आहे. ‘‘सर्फराजच्या झेलने सर्वाना आश्चर्य वाटले असेल; पण धोनीच्या नाही, कारण धोनीसाठी ती सामान्य बाब आहे. त्यामुळेच तुम्हीच ठरवा कोण सरस आहे ते. झेल टिपल्यानंतर धोनी सहज उठून उभा राहिला, मात्र लठ्ठ सर्फराजला उठायला स्लिपमधील क्षेत्ररक्षकाची मदत घ्यावी लागली. आता तुम्हीच ठरवा ३२ वर्षांच्या सर्फराजपेक्षा ३७ वर्षीय धोनी किती सरस आहे ते.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा