न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या संयमी फलंदाजीने पुन्हा एकदा आपलं महत्व सिद्ध केलं आहे. उपांत्य फेरीत भारताविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघाची पडझड होत असताना, विल्यमसनने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावलं. कर्णधार केन विल्यमसनने ९५ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ६ चौकारांचा समावेश होता.
Most runs by a captain in a WC edition:
548 – Jayawardene, 2007
548 – Williamson, 2019
539 – Ponting, 2003
507 – Finch, 2019
482 – ABD, 2015#IndvNZ #CWC19— Bharath Seervi (@SeerviBharath) July 9, 2019
या खेळीसह केन विल्यमसनने एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या कर्णधारांच्या यादीत महेला जयवर्धनेशी बरोबरी केली आहे. २००७ साली श्रीलंकेचा कर्णधार जयवर्धनेने ५४८ धावा केल्या होत्या. याचसोबत विल्यमसनने रिकी पाँटींगचा २००३ विश्वचषक स्पर्धेतला ५३९ धावांचा विक्रमही मोडीत काढला.
अवश्य वाचा – World Cup 2019 : नकोशा विक्रमात न्यूझीलंडने भारताला टाकलं मागे
न्यूझीलंडचे अन्य फलंदाज झटपट माघारी परतत असताना विल्यमसनने अनुभवी रॉस टेलरसोबत ६५ धावांची भागीदारी करत संघाच्या डावाला आकार दिला.
अवश्य वाचा – World Cup 2019 : दोन विश्वचषक स्पर्धा आणि मार्टीन गप्टीलची अधोगती