न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने विश्वचषक स्पर्धेत आपण फॉर्मात असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. मँचेस्टरच्या मैदानात वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात विल्यमसनने शतकी खेळीची नोंद केली. सलामीचे दोन्ही फलंदाज भोपळाही न फोडता माघारी परतल्यानंतर विल्यमसनने रॉस टेलरसोबत भागीदारी करत संघाचा डाव सावरला. १५४ चेंडूत विल्यमसनने १४८ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या खेळीदरम्यान विल्यमसनने दिग्गज खेळाडूंच्या मानाच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.
कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या पहिल्या दहाही देशांविरोधात शतक झळकावणारा विल्यमसन अकरावा खेळाडू ठरला आहे. याआधी हर्षल गिब्ज, सचिन तेंडुलकर, रिकी पाँटींग, विराट कोहली, रोहित शर्मा यासारख्या मातब्बर खेळाडूंनी अशी कामगिरी करुन दाखवली आहे.
Kane Williamson became the 11th batsman to score ODI centuries against all the first 10 Test playing nations.
Other 10:
Gibbs
Ponting
Tendulkar
Amla
Kohli
AB de Villiers
Guptill
Ross Taylor
Tharanga
Rohit Sharma#NZvWI #CWC19— Bharath Seervi (@SeerviBharath) June 22, 2019
तिसऱ्या विकेटसाठी विल्यमसनने रॉस टेलरसोबत १६० धावांची भागीदारी केली. रॉस टेलरने ६९ धावा करत विल्यमसनला चांगली साथ दिली. हे दोन्ही खेळाडू माघारी परतल्यानंतर न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांनी झटपट माघारी परतण पसतं केलं. विल्यमसनच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने २९१ धावसंख्या उभारली. वेस्ट इंडिजकडून शेल्डन कॉट्रेलने ४, कार्लोस ब्रेथवेटने २ तर ख्रिस गेलने १ बळी घेतला.
अवश्य वाचा – World Cup 2019 NZ vs WI : कॉट्रेलचा धडाका, न्यूझीलंडच्या सलामीवीरांना शून्यावर केलं बाद