भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन, अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. बुधवारी बीसीसीआयने शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतच्या संघात समावेशाबद्दलची घोषणा केली. यानंतर शिखरनेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सर्वांशी संवाद साधत, चाहत्यांचे आभार मानले. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिखर धवनला धीर देत, त्याचं कौतुक केलं आहे.

इंग्लंडमधल्या खेळपट्टीलाही तुझी उणीव जाणवेल. तू लवकर पुनरागमन करशील आणि संघाच्या विजयात हातभार लावशील असा मला विश्वास आहे, असं म्हणत मोदींनी शिखर धवनला धीर दिला आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही ट्विटर अकाऊंटवर शिखरचं सांत्वन केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात शिखरने शतकी खेळी केली. मात्र पॅट कमिन्सचा उसळता चेंडू खेळत असताना त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. या दुखापतीमधून तो सावरेल असा विश्वास व्यवस्थापनाला वाटत होता, मात्र त्याच्या तब्येतीत फरक न पडल्यामुळे अखेरीस शिखरला घरी पाठण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

अवश्य वाचा – World Cup 2019 : तुझं दुःख मी समजू शकतो, सचिन तेंडुलकरकडून शिखरचं सांत्वन

Story img Loader