भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज आणि उप-कर्णधार रोहित शर्माने आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवत शतकी खेळीची नोंद केली. रोहित शर्माने ११३ चेंडूत १४० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. या खेळीसाठी रोहितला सामनावीराता किताब देऊन गौरवण्यात आलं. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, रोहितने आपल्या शतकी खेळीचं श्रेय आपली लेक समायराला दिला आहे.
अवश्य वाचा – Ind vs Pak : ….म्हणून रोहित शर्मा-लोकेश राहुलची जोडी ठरली सर्वोत्तम
मी नुकत्याच एका मुलीचा बाप बनलो आहे. त्यामुळे सध्या मी जो काही चांगल्या फॉर्ममध्ये आहे त्याचं श्रेय माझ्या मुलीचं आहे. आयपीएलचा हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करुन आम्ही परतलो आहोत, याचाही तुमच्या खेळीसाठी फायदा होतो…रोहित पत्रकारांशी संवाद साधत होता.
Who does @ImRo45 owe his current good form to? #TeamIndia #INDvsPAK #CWC19 pic.twitter.com/xI56nvgKUz
— BCCI (@BCCI) June 16, 2019
दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत भारताकडून पराभव स्विकारण्याची परंपरा पाकिस्तान संघाने कायम राखली आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी मात केली. ३३७ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ३५ व्या षटकानंतर सामन्यात पावसाने हजेरी लावली. यादरम्यान बराच वेळ वाया गेल्यामुळे पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार सुधारित लक्ष्य देण्यात आलं. त्यानुसार पाकिस्तानला ५ षटकात १३६ धावा करमं भाग होतं. हे आव्हान पाकिस्तानी संघाला पेलवलं नाही.
अवश्य वाचा – Ind vs Pak : सामना जिंकूनही भारताची चिंता कायम, जायबंदी भुवनेश्वर पुढील सामन्यांना मुकणार