भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेत आपल्या पाचव्या शतकाची नोंद केली. स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू ठरला आहे. याआधी श्रीलंकेचा माजी कर्णधार व यष्टीरक्षक कुमार संगकाराने एका स्पर्धेत ४ शतकं झळकावली होती. रोहितने त्याचा विक्रम मोडीत काढला आहे. श्रीलंकेविरुद्ध सामन्यात १०३ धावांची खेळी करत रोहित शर्मा माघारी परतला.

वन-डे क्रिकेटमध्ये २०१७ सालानंतर रोहित शर्माच्या बॅटमधून धावांचा ओघ सुरुच आहे. जानेवारी २०१७ पासून आतापर्यंत सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. त्याच्या नावावर १७ शतकं जमा आहेत. विराट कोहली, जॉनी बेअरस्टो, शिखर धवन हे सध्याचे सर्व फॉर्मात असलेले फलंदाज अद्याप रोहितपर्यंत पोहचू शकलेले नाहीयेत.

२०१७ च्याआधी रोहितची वन-डे क्रिकेटमधली कामगिरी आणि २०१७ नंतरची वन-डे क्रिकेटमधली कामगिरीही ही नक्कीच कौतुकास्तपद आहे.

लोकेश राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी रोहित शर्माने १८९ धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयाचा भक्कम पाया रचला.

Story img Loader