शिखर धवनच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात धडाकेबाज पद्धतीने सुरुवात केली. लोकेश राहुलच्या सोबतीने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना रोहितने पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत रोहित शर्माने आपलं अर्धशतक साजरं केलं. केवळ ३४ चेंडूत रोहितने ही कामगिरी केली.
या खेळीसोबत रोहित शर्माने मानाच्या खेळाडूंच्या पंगतीत आपलं स्थान मिळवलं आहे. विश्वचषक स्पर्धेत ३ किंवा त्यापेक्षा जास्त अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा आलेला आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात झळकावलेलं अर्धशतक रोहितचं तिसरं अर्धशतक ठरलंय. या यादीमध्ये भारताचे माजी खेळाडू नवजोतसिंह सिद्धू पहिल्या स्थानावर आहेत. १९८७ साली सिद्धू यांनी सलग ४ अर्धशतकी खेळी केल्या होत्या.
Indians with 3 or more consecutive 50+ scores at start of a World Cup:
Navjot Sidhu, 1987 (4 in a row)
Sachin Tendulkar, 1996 (4)
Yuvraj Singh, 2011 (3)
Rohit Sharma, 2019 (3*)#IndvPak #CWC19— Bharath Seervi (@SeerviBharath) June 16, 2019
दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाने एकदाही भारतावर मात केली नाहीये. आतापर्यंतच्या लढतीमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध सहा सामने जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघ आपली ही विजयी परंपरा कायम राखतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.