दीपक जोशी
विश्वचषक क्रिकेट इतिहासात सलग पाचवे अर्धशतक साकारण्याचा विक्रम शाकिब अल हसनला साद घालत आहे. विंडीजविरुद्धच्या सामन्यात शाकिबने सलग चौथी अर्धशतकी (नाबाद १२४) खेळी साकारताना विश्वचषकातील विक्रमाची बरोबरी केली होती. सलग चार अर्धशतकांचा विश्वचषकातील विक्रम नवज्योतसिंग सिद्धू (१९८७), सचिन तेंडुलकर (१९९६) आणि ग्रॅमी स्मिथ (२००७) यांच्या नावावर आहे. त्यामुळे शाकिब नव्या विक्रमाच्या उंबरठय़ावर आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून रिकी पाँटिंगने सर्वाधिक १३ हजार धावांचा मानसबदार होण्याचा मान मिळवला आहे. त्यानंतर पाच ते नऊ हजारांदरम्यान धावा करणारे ऑस्ट्रेलियाचे ११ खेळाडू आहेत. सध्याच्या संघातील डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनाही पाच हजार धावा करणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवण्याची संधी आहे.