भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनला अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे, विश्वचषक स्पर्धेतलं आपलं स्थान गमवावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात पॅट कमिन्सचा चेंडू खेळताना शिखरच्या अंगठ्याला चेंडू लागला. ही दुखापत इतकी मोठी होती की शिखरच्या हाताल प्लास्टर घालावं लागलं. यानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये पाठवत, धवनला दुखापतीमधून सावरण्याचा वेळ दिला होता. मात्र त्याची दुखापत बरी होत नसल्याचं समजताच बीसीसीआयने अधिकृतपणे शिखर धवन खेळणार नसल्याची माहिती दिली.
शिखर धवननेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत, So Must Go On असं म्हणत सर्वांचे आभार मानले आहेत.
I feel emotional to announce that I will no longer be a part of #CWC19. Unfortunately, the thumb won’t recover on time. But the show must go on.. I’m grateful for all the love & support from my team mates, cricket lovers & our entire nation. Jai Hind! pic.twitter.com/zx8Ihm3051
— Shikhar Dhawan (@SDhawan25) June 19, 2019
धवनच्या जागी डावखुरा फलंदाज ऋषभ पंतची संघात निवड झाली आहे. धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल सलामीला येणार आहे. चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी विजय शंकरने आश्वासक कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळे ऋषभ पंतला संघात जागा मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – World Cup 2019 : ऋषभसाठी सबर का फल मीठा ! धवनच्या दुखापतीमुळे विश्वचषकात संधी