२०१९ विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच सामन्यात विंडिजच्या संघाने पाकिस्तानवर ७ गडी राखून मात केली. विंडिजच्या आक्रमणासमोर पाकिस्तानचा संघ अवघ्या १०५ धावांवर गारद झाला. या पराभवानंतर सरफराज खानच्या पाकिस्तान संघावर माजी पाक खेळाडूंनी टिकेची झोड उठवली. नेटकऱ्यांनीही सोशल मीडियावर पाकिस्तानच्या संघाला चांगलच ट्रोल केलं.

पाकचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने, सरफराज खान हा ढेरपोटा कर्णधार असून त्याच्याइतका अनफिट खेळाडू मी पाहिला नसल्याचं म्हटलं होतं. ३ जूनरोजी पाकिस्तानसमोर यजमान इंग्लंडचं आव्हान आहे. त्या सामन्याआधी शोएब अख्तरने आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी, इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील एका कसोटी सामन्याचा फोटो टाकत संघाला शुभेच्छा दिल्या.

शोएब अख्तरने टाकलेल्या या शुभेच्छांवर इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पिटरसननेही अख्तरची चांगलीच फिरकी घेतली.

शोएब अख्तरनेही पिटरसनच्या फिरकीला चांगलचं प्रत्युत्तर दिलं.

Story img Loader