विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अफगाणिस्तानवर मात करत आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर संघाच्या कामगिरीवर खुश नाहीये. विशेषकरुन मधल्या फळीत महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी संथ खेळ केल्याचं सचिनने बोलुन दाखवलं. तो India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – Cricket World Cup 2019 : नियमांचा भंग केल्याप्रकरणी विराट कोहलीला दंड

“मी भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल थोडासा निराश आहे, आपण अजुन चांगला खेळ करु शकलो असतो. केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात झालेली भागीदारी ही अतिशय संथ होती. आपण सामन्यातील ३४ षटकं फिरकी गोलंदाजीवर खेळलो आणि फक्त ११९ धावा काढल्या. फिरकी गोलंदाजीवर खेळताना आपण प्रचंड चाचपडत होतो. आपल्या फलंदाजांमध्ये अजिबात सकारात्मकता दिसत नव्हती.” सचिन मुलाखतीमध्ये बोलत होता.

अवश्य वाचा – World Cup 2019 : धोनीचा सल्ला कामी आला, हॅटट्रीकनंतर मोहम्मद शमीची प्रतिक्रिया

धोनी आणि केदार जाधव यांनी ५७ धावांची भागीदारी केली. मात्र यासाठी दोन्ही फलंदाजांनी प्रचंड चेंडू खर्च केले. “प्रत्येक षटकात २-३ चेंडू निर्धाव जात होते. ३८ व्या षटकात विराट माघारी गेल्यानंतर ४५ व्या षटकापर्यंत आपण योग्य त्या गतीने धावा केल्याच नाहीत. यादरम्यान आपण अधिक सकारात्मक पद्धतीने फलंदाजी करु शकलो असतो.” सचिनने आपलं कठोर मत व्यक्त केलं. विराट कोहलीचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही.