२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली आहे. आतापर्यंत झालेल्या ४ सामन्यांपैकी भारताला एका सामन्यावर पावसामुळे पाणी सोडावं लागलं. बाकीच्या तिन्ही सामन्यात भारताने विजय संपादन केला. शनिवारी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे, साऊदम्पटनच्या मैदानावर हा सामना रंगेल. स्थानिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या दिवशी पावसाची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाहीये.
स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजेपर्यंत साऊदम्पटनमध्ये उन असेल. यानंतर वातावरण थोडं ढगाळ होऊन, जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. यादिवसाचं तापमान १३ ते २० डिग्री सेल्सिअरपर्यंत असेल. मात्र पावसाची शक्यता नाकारली आहे. अफगाणिस्तानचा संघ सध्या गुणतालिकेत तळाशी असून, भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. याव्यतिरीक्त विश्वचषकातील चार सामन्यांना पावसाचा फटका बसला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाही पावसामुळे कमी षटकांचा करण्यात आला होता. या सर्व गोष्टींमुळे क्रीडाप्रेमींनी आयसीसीवर टीका केली होती. त्यामुळे भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यावरील पावसाचं सावट हटल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.