मँचेस्टरच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात, विंडीजचा गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने धडाकेबाज कामगिरी केली आहे. न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना शून्यावर माघारी धाडण्यात कॉट्रेल यशस्वी ठरला. मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरो पहिल्याच षटकात भोपळाही न फोडता माघारी परतले. कॉलिन मुनरो त्रिफळाचीत तर गप्टील पायचीत होऊन माघारी परतला.
वन-डे क्रिकेटमध्ये एका डावात सलामीवीर शून्यावर बाद होण्याची ही तिसरी वेळ ठरली. याआधी २०१५ साली श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात दोन्ही सलामीवीर शून्यावर माघारी परतले होते.
Both openers bagging golden ducks in an ODI inning:
Zimbabwe vs Windies, 2006
Sri Lanka vs Afghanistan, 2015
NEW ZEALAND vs WINDIES, Today#CWC19 #WIvNZ— Sampath Bandarupalli (@SampathStats) June 22, 2019
मात्र यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.